आपल्याला एवढे मेगापिक्सेल खरंच लागतात का?
‘तुम्हाला मेगापिक्सेल पाहिजेत ना, मग हे घ्या मेगापिक्सेल' आजकालच्या प्रत्येक मोबाईलच्या जाहिरातीत, कंपनी मनातल्या मनात ग्राहकाला हे वाक्य म्हणत असेल, असं मला नेहमी वाटतं. कारण मोबाईलमध्ये जास्त मेगापिक्सेलचा सेन्सर द्यायची शर्यतच जणू कंपन्यांनी सुरू केली आहे. बघा ना....48 mp काय, 64 mp काय, एका नवीन मोबाईल मध्ये तर 108 mp चा सेन्सर दिला आहे कंपनीने. मुळात एवढे मेगापिक्सेल आपल्याला लागतात का? हा प्रश्न खूप कमी जणांना पडतो. बाकीचे बिचारे ग्राहक संख्येच्या प्रभावाला बळी पडून आपले पैसे कंपनीला देऊन मोकळे होतात, पण त्यांच्या हातात फारसं काही पडत नाही. आपण कधी विचार केला आहे का, की मेगापिक्सेल ह्या संकल्पनेचा नक्की अर्थ काय? फोटोग्राफी मध्ये मेगापिक्सेल चा उपयोग काय आहे? ते कमी किंवा जास्त असतील तर फोटोमध्ये काय फरक पडतो? ह्याबद्दलची माहिती ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत. 'मेगापिक्सेल' हा शब्द दोन छोट्या शब्दांनी बनलेला आहे. 'मेगा' आणि 'पिक्सेल'. 'मेगा' ह्या शब्दाचा अर्थ 10 लाख एवढी संख्या. हा अर्थ इंग्रजी मापनपद्धतीवरून आला आहे. आणि 'पिक्सेल...