Posts

Showing posts with the label सामान्य

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

Image
  (Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)     मोबाईल हे यंत्र जेव्हापासून आपल्या हातात आलं आहे, तेव्हापासून आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींची जागा त्याने घेतली आहे. आधी आपल्याला गाणी ऐकायला रेडियो किंवा आयपॉड लागायचा, गजरासाठी घड्याळ लागायचं, प्रकाशासाठी बॅटरी लागायची आणि बरंच काही. पण आता ही सगळी कामं एकट्या मोबाईल मध्येच होतात.      आजकालच्या मोबाईलमध्ये असलेलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तमोत्तम होत चाललेला कॅमेरा . काही ठराविक गोष्टी सोडल्या, तर बाकी सगळ्या बाबतीत मोबाईलचा कॅमेरा, DSLR किंवा मिररलेस कॅमेऱ्याएवढाच चांगला फोटो देऊ शकतो. काही वेळेला व्हीडीओसुद्धा. त्यातही त्या कॅमेऱ्याला काही ऍक्सेसरीजची जोड दिली तर आपल्याला अजूनच चांगले फोटो  किंवा व्हीडीओ काढता येतात. शिवाय काही मोबाईल ऍप्स सुद्धा काढलेला फोटो किंवा व्हीडीओ चांगला बनवण्यात मदत करू शकतात.  अशाच काही ऍक्सेसरीज आणि ऍप्स ची साधारण माहिती ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण ...

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

Image
     आजकाल 'सोशल मीडिया' हे एक नवीन जगच बनलं आहे. व्हाट्सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी ऍप्स आहेत. पण काही जण ही ऍप्स फक्त, दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे ह्याची माहिती घेणे आणि आपल्या आयुष्यात काय काय चालू आहे ह्याची माहिती बाकीच्यांना देणे, ह्यासाठीच वापरतात.       पण आपण ही ऍप्स बाकीच्या बऱ्याच कामांसाठी वापरू शकतो, ज्याच्यासाठी त्यांच्यामध्ये दिलेल्या बऱ्याच सोयींचा उपयोग होईल. जसं की फोटोग्राफर म्हणून आपला एक पोर्टफोलिओ तयार करणे, ह्याच क्षेत्रातील बाकीच्या लोकांशी जोडले जाणे, व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करणे, ई.      आता हे सर्व करण्यासाठी आपल्याला सतत फोटो आणि व्हीडीओ आपलोड करावे लागतात. पण हे करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत , ज्याच्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळेल आणि पुढे काही त्रास सुद्धा होणार नाही. अशाच काही साध्या पण महत्वाच्या गोष्टी आपण ह्या पोस्टमध्ये बघणार आहोत.      पहिल्यांदा आपण बघुयात की आपण टाकत असलेल्या फोटोला आणि व्हीडीओला चांगला प...

उत्तम सेल्फी काढण्यासाठी ट्रीक्स आणि टिप्स

Image
      सेल्फी हा प्रकार माहीत नसलेला माणूस आपल्याला सापडणारच नाही. प्रत्येक जण नेहमी सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असतो. हॉटेलमध्ये जेवताना, फिरायला गेल्यावर, लग्नात नवरानवरी बरोबर स्टेजवर किंवा अगदी गाडी चालवताना सुद्धा.      काही जण तर सेल्फी काढताना स्थळ आणि काळाचं भान सुद्धा विसरून जातात. असा हा सेल्फी चा महिमा. 😅      सेल्फी म्हणजे काय हे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं, तर 'स्वतःचा किंवा आपल्या ग्रुपचा स्वतःचाच काढलेला फोटो, म्हणजे सेल्फी' . आता खरं म्हणजे हे सांगायची तशी काही गरज नाही. पण बऱ्याचदा काही लोक समोरच्याला असं बोलून जातात, की 'हा घे मोबाईल आणि माझा सेल्फी काढ.' . त्या खास लोकांसाठी सेल्फीची ही व्याख्या. 😂      एक चांगला सेल्फी काढण्यासाठी बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. त्यातले काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. 1. मोबाईल हातात कसा धरावा? 2. मोबाईलमधल्या काही खास मोड्सचा वापर. 3. सेल्फी काढताना फ्रेमिंग कसं करावं? 4. आपला चांगला अँगल ओळखणे. 5. सेल्फी स्टिक चा वापर. चला तर मग, ह्याच मुद्द्यांची सविस्तर म...

फोटोग्राफीमधले विविध गुरु

Image
‘योग्य मार्ग दाखवतो, तोच खरा गुरू'      प्रत्येक क्षेत्रात आपल्याला एक तरी गुरू असतोच. मग तो कुठल्याही स्वरूपात असू शकतो. आज आपण जे काही आहोत ते अशा गुरूंमुळेच आहोत, हे मान्य करायलाच पाहिजे. काही गुरू हे थोड्या कालावधीसाठी शिकवतात, तर काही गुरू हे आयुष्यभर आपल्या बरोबर राहतात. काही गुरूंना गुरुदक्षिणा द्यावी लागते, काहींना नाही लागत. पण ह्या सगळ्या गुरूंचा आपल्या ज्ञानात आणि व्यक्तिमत्वात अमूल्य असा वाटा आहे, हे मात्र खरं.       माझ्या फोटोग्राफी च्या ज्ञानाच्या वृद्धीमध्ये कैक गुरूंनी महत्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येकाची शैली वेगळी, प्रत्येकाचे स्वरूप वेगळे. काही समोर बसून शिकवतात, तर काही आपल्यापासून खूप दूर राहून. त्यातल्याच काहींबद्दल ह्या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच गुरूंकडून तुम्हीही पाहिजे तेव्हा हे ज्ञान घेऊ शकता.  1) इंटरनेट      आजकालच्या जगात इंटरनेट न वापरणारा माणूस सापडणं  अगदीच कठीण आहे. काहीही अडलं, तरीही त्याबद्दल इंटरनेट वर आपल्याला माहिती मिळतेच मिळते. हा गुरू असा आहे, ज्याने, 'कॅमेरा म्हणजे क...

फोटोग्राफी - एक कला

Image
           असं म्हणतात की वेळ कुणासाठी थांबत नाही. किंबहुना तशी ती थांबवताही येत नाही. त्यामुळे एखादी वेळ किंवा एखादा क्षण निघून गेला की गेला....आपण परत तो अनुभवू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक क्षण त्याच वेळी अनुभवायला आणि जगायला शिकलं पाहिजे😌 .                 पण प्रत्येक वेळेला मनातून जरी तशी इच्छा असली , तरीही काही कारणांमुळे आपल्याला ते शक्य होईलच असं नाही. आपल्या मनानुसार सगळ्या गोष्टी घडतील असं नाही.  पण ‘ हीच आपली सीमा आहे ’ असं मानून शांत बसेल तो माणूस कसला 😎. त्यामुळे ‘ गरज ही शोधाची जननी आहे ’ ह्या उक्तीतून प्रेरणा घेऊन आणि विज्ञानाची मदत घेऊन माणसाने ‘ कॅमेरा ’ ह्या अफलातून यंत्राचा शोध लावला. आणि त्याच्या वापराच्या तंत्राला आपण ‘ फोटोग्राफी ’ म्हणजेच ‘ छायाचित्रण ’   म्हणून ओळखायला लागलो. 📸                फोटोग्राफी हा मूळचा ग्रीक शब्द , दोन भाग असलेला (फोटो आणि ग्राफी). ह्या शब्दाचा अर्थ शोधायला गेलात , तर थोड्या फार फरक...