उत्तम सेल्फी काढण्यासाठी ट्रीक्स आणि टिप्स
सेल्फी हा प्रकार माहीत नसलेला माणूस आपल्याला सापडणारच नाही. प्रत्येक जण नेहमी सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असतो. हॉटेलमध्ये जेवताना, फिरायला गेल्यावर, लग्नात नवरानवरी बरोबर स्टेजवर किंवा अगदी गाडी चालवताना सुद्धा. काही जण तर सेल्फी काढताना स्थळ आणि काळाचं भान सुद्धा विसरून जातात. असा हा सेल्फी चा महिमा. 😅 सेल्फी म्हणजे काय हे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं, तर 'स्वतःचा किंवा आपल्या ग्रुपचा स्वतःचाच काढलेला फोटो, म्हणजे सेल्फी' . आता खरं म्हणजे हे सांगायची तशी काही गरज नाही. पण बऱ्याचदा काही लोक समोरच्याला असं बोलून जातात, की 'हा घे मोबाईल आणि माझा सेल्फी काढ.' . त्या खास लोकांसाठी सेल्फीची ही व्याख्या. 😂 एक चांगला सेल्फी काढण्यासाठी बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. त्यातले काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. 1. मोबाईल हातात कसा धरावा? 2. मोबाईलमधल्या काही खास मोड्सचा वापर. 3. सेल्फी काढताना फ्रेमिंग कसं करावं? 4. आपला चांगला अँगल ओळखणे. 5. सेल्फी स्टिक चा वापर. चला तर मग, ह्याच मुद्द्यांची सविस्तर म...