मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स
(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.) मोबाईल हे यंत्र जेव्हापासून आपल्या हातात आलं आहे, तेव्हापासून आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींची जागा त्याने घेतली आहे. आधी आपल्याला गाणी ऐकायला रेडियो किंवा आयपॉड लागायचा, गजरासाठी घड्याळ लागायचं, प्रकाशासाठी बॅटरी लागायची आणि बरंच काही. पण आता ही सगळी कामं एकट्या मोबाईल मध्येच होतात. आजकालच्या मोबाईलमध्ये असलेलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तमोत्तम होत चाललेला कॅमेरा . काही ठराविक गोष्टी सोडल्या, तर बाकी सगळ्या बाबतीत मोबाईलचा कॅमेरा, DSLR किंवा मिररलेस कॅमेऱ्याएवढाच चांगला फोटो देऊ शकतो. काही वेळेला व्हीडीओसुद्धा. त्यातही त्या कॅमेऱ्याला काही ऍक्सेसरीजची जोड दिली तर आपल्याला अजूनच चांगले फोटो किंवा व्हीडीओ काढता येतात. शिवाय काही मोबाईल ऍप्स सुद्धा काढलेला फोटो किंवा व्हीडीओ चांगला बनवण्यात मदत करू शकतात. अशाच काही ऍक्सेसरीज आणि ऍप्स ची साधारण माहिती ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण ...