फोटोग्राफीचे प्रकार - किती व कोणते?
' तो सध्या काय करतो ?' असा प्रश्न जेव्हा काही लोक माझ्या घरच्यांना विचारतात , तेव्हा ' फोटोग्राफी करतो. ' असं उत्तर त्यांना मिळतं. पण विचारणारे तेवढ्यावर थांबत नाहीत हो. पुढचा प्रश्न तयार असतो , ' म्हणजे नक्की काय करतो ? वाइल्ड लाईफ फोटोग्राफी का वेडिंग फोटोग्राफी ?' फोटोग्राफी ही एवढ्या दोनच प्रकारची आहे असं 90% लोकांना पहिल्या फटक्यात वाटतं , याचं मला आश्चर्य वाटतं. आणि म्हणून तोच गैरसमज आज आपण दूर करणार आहोत. 🙂 आधीच्या काळात अगदी मोजकेच प्रकार होते. पण म्हणतात ना ' मागणी तसा पुरवठा '. त्यामुळे जसजशी गरज वाढत गेली , तसतसे फोटोग्राफीचे प्रकार पण वाढत गेले. आणि आता तर कित्येक जण फक्त एकाच प्रकारची फोटोग्राफी करतात आणि त्यात अगदी तज्ञ होतात. तर बघुयात की कोणकोणते प्रकार आहेत फोटोग्राफी मध्ये. 1. वाइल्ड लाईफ फोटोग्राफी (Wild life photography) 1. म्हणजे काय:- वाइल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणजे ' वन्यजीव आणि त्यांचे जीवन ' टिपणे. यामध्ये प्राण्यांचे/पक्ष्यांचे भाव , त्यांच्या हालचाली , त्यांचं राहणीमान , त्यांच...