एक्सपोजरचा त्रिकोण म्हणजे फोटोग्राफी चा पाया.
फोटो बघितल्या बघितल्या आवडण्यासाठी त्यात योग्य तेवढा प्रकाश असावा लागतो. आणि फोटोग्राफी मध्ये हेच शिकण्यासाठी भरपूर वेळ लागतो. बाकीच्या बऱ्याच गोष्टी ह्या आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने आपोआप मिळवता येतात. पण प्रत्येक वेळेला 'फोटोमधला प्रकाश' योग्य येण्यासाठी, फक्त फोटो काढणाऱ्यालाच प्रयत्न करावे लागतात. ह्यालाच इंग्रजीत एक्सपोजर म्हणतात. कुठल्याही फोटोचे ह्या एक्सपोजर नुसार तीन भाग करता येतात. हायलाईट्स (Highlight), मिड टोन्स (midtones) आणि शॅडोज (shadows). या तिन्हींचा योग्य मेळ घालणे, म्हणजेच योग्य एक्सपोजर मिळवणे. हायलाईट असलेले पिक्सेल हे पांढरा रंग किंवा उजळ (ब्राईट) भाग दर्शवतात, शॅडो असलेले पिक्सेल हे काळा रंग किंवा अंधार असलेला (डार्क) भाग दर्शवतात आणि ह्या दोन्हींचा मधला भाग हा मिडटोन्स म्हणून ओळखला जातो. म्हणजेच ब्राईट आणि डार्क रंगांचा योग्य मेळ म्हणजे योग्य एक्सपोजर. असं हे योग्य एक्सपोजर मिळवण्यासाठी आपल्याला प्रकाश नियंत्रित करता येणं खूप गरजेचं आहे. आणि हे आपण कॅमेऱ्याच्या मॅन्युअल मोड मध्...