Posts

Showing posts from July, 2020

एक्सपोजरचा त्रिकोण म्हणजे फोटोग्राफी चा पाया.

Image
     फोटो बघितल्या बघितल्या आवडण्यासाठी त्यात योग्य तेवढा प्रकाश असावा लागतो. आणि फोटोग्राफी मध्ये हेच शिकण्यासाठी भरपूर वेळ लागतो. बाकीच्या बऱ्याच गोष्टी ह्या आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने आपोआप मिळवता येतात. पण प्रत्येक वेळेला 'फोटोमधला प्रकाश' योग्य येण्यासाठी, फक्त फोटो काढणाऱ्यालाच प्रयत्न करावे लागतात.      ह्यालाच इंग्रजीत एक्सपोजर म्हणतात. कुठल्याही फोटोचे ह्या एक्सपोजर नुसार तीन भाग करता येतात. हायलाईट्स (Highlight), मिड टोन्स (midtones) आणि शॅडोज (shadows). या तिन्हींचा योग्य मेळ घालणे, म्हणजेच योग्य एक्सपोजर मिळवणे.       हायलाईट असलेले पिक्सेल हे पांढरा रंग किंवा उजळ (ब्राईट) भाग दर्शवतात, शॅडो असलेले पिक्सेल हे काळा रंग किंवा अंधार असलेला (डार्क) भाग दर्शवतात आणि ह्या दोन्हींचा मधला भाग हा मिडटोन्स म्हणून ओळखला जातो. म्हणजेच ब्राईट आणि डार्क रंगांचा योग्य मेळ म्हणजे योग्य एक्सपोजर.      असं हे योग्य एक्सपोजर मिळवण्यासाठी आपल्याला प्रकाश नियंत्रित करता येणं खूप गरजेचं आहे. आणि हे आपण कॅमेऱ्याच्या मॅन्युअल मोड मध्...

ISO - कॅमेर्‍याचा खोटा खोटा प्रकाश

Image
     फोटो/व्हीडीओ शूट करताना चांगला दर्जा पाहिजे असेल, तर आपल्याला प्रकाशावरच अवलंबून रहायला लागतं. प्रकाश किती आहे, कसा आहे, आपल्याला पाहिजे त्या दिशेतून येतोय का, ई. गोष्टींवर सतत लक्ष ठेवावं लागतं.      आपण आपल्याला पाहिजे तसा लाईट सेटअप वापरू शकतो. पण तरीही आपल्या हातात मोबाईल असो, छोटा डिजिटल कॅमेरा असो किंवा कोणताही मोठा कॅमेरा असो, कुठेतरी थोडी तडजोड करावीच लागते. ह्या बाबतीत ISO ह्या पर्यायाची आपल्याला मदत होते. त्याबाबतीतच आज आपण ह्या पोस्ट मध्ये जास्त माहिती घेणार आहोत. ISO कसं काम करतो      ह्या पोस्टच्या शिर्षकावरून तुम्हाला थोडा अंदाज आला असेल. 'ISO म्हणजे कॅमेऱ्यातील खोटा प्रकाश'. खोटा ह्यासाठी, की  हा प्रकाश नैसर्गिक रित्या सेन्सरवर पडलेला नसतो, तर तो कॅमेऱ्याने स्वतःच तयार केलेला असतो. म्हणजे सेन्सरनी गोळा केलेल्या माहिती मध्ये थोडा फेरफार करून हा प्रकाश वाढवला जातो.      म्हणजे असं, की बाहेर कमी प्रकाश असताना आपण कॅमेऱ्यात ISO ची किंमत वाढवली, की कॅमेरा त्याच्यातील प्रोसेसर च्या मदतीने फोटोमधल्या काही डार्...

शटर - प्रकाशासाठी दरवाजा

Image
बरेच जण असं म्हणतात, की 'फोटोग्राफी मध्ये बाकीचं काहीही नाही आलं तरी चालेल, पण प्रकाश नियंत्रित करता आला पाहिजे'. आणि हे अगदी बरोबर आहे. कारण फोटो बघितल्यावर बघणाऱ्याला काय वाटेल, तो त्याचा काय अर्थ घेईल, ह्याच्यावर फोटोमधल्या प्रकाशाचा खूप मोठा प्रभाव पडतो. हा प्रकाश नियंत्रित करण्याचे बरेच मार्ग आहेत. शटर स्पीड हा त्यातलाच एक मार्ग आहे. ह्याचीच माहिती ह्या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत. मुळात शटर म्हणजे काय ते आधी बघुयात. दुकानाचं शटर ह्याचा आपण जो अर्थ घेतो, तोच अर्थ ह्या शटर चा सुद्धा आहे. दुकानाचं शटर माणसांना प्रवेश देतं किंवा नाकारतं, तर कॅमेऱ्याचं शटर प्रकाशाला प्रवेश देतं किंवा नाकारतं . त्यामुळे फोटोमध्ये किती प्रकाश पाहिजे, ह्यावरून शटर किती वेळ उघडं ठेवायचं, हे ठरवलं जातं. फक्त फोटो काढायची वेळ सोडली, तर DSLR मध्ये पूर्ण वेळ शटर मुळे सेन्सर झाकलेला असतो. मिरर लेस कॅमेऱ्यामध्ये फक्त फोटो काढायच्या वेळेला शटर उघड-झाप करते. बाकीच्या वेळेला सेन्सर उघडाच असतो. कॅमेऱ्यामध्ये शटरचे एकूण 2 प्रकार असतात. एक म्हणजे मेकॅनिकल शटर (Mechanical shutter) आणि दुसरा म्हणजे इलेक्...

लेन्स अपर्चर - कॅमेर्‍याची बाहुली

Image
(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)      निसर्गासारखा चमत्कार कुणीही करू शकत नाही. आपला डोळा हा सुद्धा एक चमत्कारच म्हणावा लागेल. एवढ्याशा अवयवामध्ये किती संवेदनशीलपणा आहे बघा ना. समोरून येणारा प्रकाश कमी जास्त झाला, की त्याप्रमाणे लगेच आपल्या डोळ्यामधली बाहुली लहान मोठी होते. हे एवढ्यासाठी, की सतत गरज असेल तेवढाच ठराविक प्रकाश डोळ्यातून आत यावा आणि समोरचं दृश्य दिसत रहावं म्हणून.  कॅमेऱ्याच्या बाबतीत हे काम लेन्स मधील अपर्चर करतं. ह्याचीच माहिती ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत.      अपर्चर म्हणजे लेन्स च्या मागच्या भागात पातळ पात्यांनी बनवलेली एक उघडी जागा, जी आपल्याला गरजेनुसार लहान-मोठी करता येते. खालच्या फोटो मध्ये आपण लेन्सचं अपर्चर आणि अपर्चर ब्लेडस (सरकवता येणारी पाती) बघू शकतो.      फोटोग्राफीच्या क्षेत्रात अपर्चर ची किंमत ही 'f' नी दर्शवतात. म्हणजे f2.8, f4, f5.6, etc. 'f' च्या पुढील किंमत ही '1 च्या छेदात' असते. म्हणजे f4 म्हणजे...

फोटो एडिटिंग करणे बरोबर का चूक?

Image
     आजकाल फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सऍप ई. सोशल मीडियावर आणि एकूणच पूर्ण इंटरनेट वर आपण जे काही बघतो, त्यावरून 'जो दीखता है, वही बिकता है' ह्या म्हणीची प्रचिती येते. कारण प्रत्येक जण आपली वस्तू किंवा सेवा इतरांपेक्षा कशी चांगली आहे, हे दाखवण्याची धडपड करताना दिसतो. त्यासाठी त्या वस्तूचे किंवा सेवेचे जे फोटो-व्हीडीओ तयार केलेले असतात, ते एडिटिंग करण्यावर भर दिला जातो. कारण प्रत्येकाला व्यवसायात प्रगती करायची आहे आणि पैसे कमवायचे आहेत.      तसंच व्यवसायाव्यतिरिक्त आपण जे वैयक्तिक फोटो इंटरनेट किंवा सोशल मीडियावर बघतो, त्यातही 'मी कसा भारी आहे' हे दाखवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. म्हणजे फोटो कितीही साधा असो, त्याला असं काही एडिटिंग करतात की बघणारा भारावून गेला पाहिजे, असाच त्यांचा हट्ट असतो. ह्यातही डोळ्यांना छान वाटणारं आणि डोळ्यांना त्रास देणारं, असं दोन्ही टोकांचं एडिटिंग करणारे लोक आपण रोज पाहतो.      पण हे सगळं बघताना काही प्रश्न इद्भवतात, जसे की प्रत्येक फोटोला एडिटिंगची गरज असतेच का? किती एडिटिंग केलं म्हणजे जास्त वाटणार नाही? एडिट...

लेन्सेसचे विविध प्रकार - भाग 2

Image
(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)    फोटोग्राफी मध्ये, फोटो चांगला येण्यामध्ये कॅमेरा पेक्षा लेन्सचा वाटा अधिक असतो. पण बाजारात इतक्या कंपन्यांची इतक्या प्रकारची लेन्सेस उपलब्ध आहेत, की कुठलं लेन्स घ्यावं हा खूप गोंधळात पाडणारा प्रश्न आहे. त्यामुळेच आपण 'लेन्सचे प्रकार' ह्याबद्दल सविस्तर माहिती घेत आहोत. पण हा एवढा मोठा विषय आहे, की तो आपण 2 पोस्टमध्ये विभागला आहे. मागच्या पोस्टमध्ये आपण 'लेन्सच्या वापरानुसार पडलेले' प्रकार बघितले(मागील पोस्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा :- लेंसेस चे वापरानुसार पडलेले प्रकार ).आता ह्या पोस्ट मध्ये आपण 'फोकल लेन्थ नुसार पडलेले' लेन्सचे प्रकार बघणार आहोत.      ह्यासाठी सर्वात आधी 'फोकल लेन्थ' ही संकल्पना समजून घेतली पाहीजे. मागच्या पोस्टमध्ये आपण बघितलं, प्रत्येक लेन्स मध्ये ज्या अंतरगोल आणि बहिर्गोल काचा/भिंगे वापरलेली असतात, त्यांच्या रचनेमुळे लेन्स मध्ये एक बिंदू असा असतो, जिथे आत येणारा सर्व प्रकाश केंद्रित होतो. त्याल...