ऍक्शन कॅमेरा म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका
(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.) आपण ह्याआधीच्या एका पोस्ट मध्ये कॅमेऱ्याचे मुख्य प्रकार बघितले आहेत. म्हणजे पोलराईड कॅमेरा, पॉईंट अँड शूट कॅमेरा, DSLR कॅमेरा आणि मिररलेस कॅमेरा. (ती पोस्ट वाचली नसेल, तर ह्या लिंकवर जाऊन वाचू शकता.:- कॅमेर्याचे प्रकार ) पण त्यातल्या पॉईंट अँड शूट कॅमेऱ्याचा दुसरा एक प्रकार असाही आहे, की समोर बघितल्यावर कुणालाही वाटणार नाही की तो एवढा जबरदस्त आहे. तो प्रकार म्हणजे 'ऍक्शन कॅमेरा'. ऍक्शन कॅमेरा म्हणजे नक्की कुठला कॅमेरा? तर त्याच्या नावावरून आपल्याला कळतंय तसाच तो आहे, म्हणजे ऍक्शन शूट करण्यासाठी. मग ती ऍक्शन कुठलीही असो. म्हणजे कुठलाही खेळ असो, पाण्याखाली केलेलं स्कुबा डायव्हिंग असो, बर्फात केलेलं स्कीइंग असो किंवा अगदी साधी बाईक राईड असो. अशा बऱ्याच ठिकाणी ऍक्शन कॅमेऱ्याचा उपयोग होतो, जिथे बाकी कुठलेही कॅमेरे वापरणं शक्य होत नाही. ह्याचीच माहिती ह्या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत. ...