Posts

लेन्सेसचे विविध प्रकार - भाग १

Image
(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.) फोटोग्राफी ही एक अशी कला आहे, जी फक्त एक छंद म्हणून जोपासली जाऊ शकते किंवा नीट अभ्यास आणि विचार केला, तर त्या कलेचं रूपांतर एका मोठ्या व्यवसायात सुद्धा होऊ शकतं. फक्त एवढं नक्की आहे, की दोन्ही प्रकारात हे खूप ' खर्चिक ' प्रकरण आहे. खर्चिक ह्यासाठी, की चांगला कॅमेरा घेण्यासाठी खर्च तर करावाच लागतो, पण त्याचा पुरेपूर वापर करून त्याला पूर्ण न्याय देण्यासाठी, तेवढ्याच चांगल्या दर्जाची आणि ताकदीची वेगवेगळी लेन्सेसही घ्यावी लागतात.      पण ही वेगवेगळ्या प्रकारची लेन्सेस का घ्यावी लागतात? एकच लेन्स घेऊन आपण फोटो काढू शकत नाही का? नसेल तर तसं का आहे? ह्या बाबतीतच ही पोस्ट आहे. 'लेन्सेस चे प्रकार'. लेन्सचे प्रकार हे समजायला सोप्या अशा 2 भागांत विभागले जाऊ शकतात.  1) लेन्सच्या वापरानुसार पडलेले प्रकार 2) फोकल लेन्थ नुसार पडलेले प्रकार      हा विषय खूप मोठा आणि महत्वाचा असल्यामुळे, ह्यातला फक्त पहिला भाग म्हणजे 'लेन्सच्या वापरान...

फोटोग्राफीमधले विविध गुरु

Image
‘योग्य मार्ग दाखवतो, तोच खरा गुरू'      प्रत्येक क्षेत्रात आपल्याला एक तरी गुरू असतोच. मग तो कुठल्याही स्वरूपात असू शकतो. आज आपण जे काही आहोत ते अशा गुरूंमुळेच आहोत, हे मान्य करायलाच पाहिजे. काही गुरू हे थोड्या कालावधीसाठी शिकवतात, तर काही गुरू हे आयुष्यभर आपल्या बरोबर राहतात. काही गुरूंना गुरुदक्षिणा द्यावी लागते, काहींना नाही लागत. पण ह्या सगळ्या गुरूंचा आपल्या ज्ञानात आणि व्यक्तिमत्वात अमूल्य असा वाटा आहे, हे मात्र खरं.       माझ्या फोटोग्राफी च्या ज्ञानाच्या वृद्धीमध्ये कैक गुरूंनी महत्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येकाची शैली वेगळी, प्रत्येकाचे स्वरूप वेगळे. काही समोर बसून शिकवतात, तर काही आपल्यापासून खूप दूर राहून. त्यातल्याच काहींबद्दल ह्या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच गुरूंकडून तुम्हीही पाहिजे तेव्हा हे ज्ञान घेऊ शकता.  1) इंटरनेट      आजकालच्या जगात इंटरनेट न वापरणारा माणूस सापडणं  अगदीच कठीण आहे. काहीही अडलं, तरीही त्याबद्दल इंटरनेट वर आपल्याला माहिती मिळतेच मिळते. हा गुरू असा आहे, ज्याने, 'कॅमेरा म्हणजे क...

लेन्स म्हणजे कॅमेर्‍याचा डोळा - त्याचं काम कसं चालतं ?

Image
    आपल्या डोळ्याचं आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. सभोवताली असणारं जग पाहण्याची अत्यंत आनंदाची क्रिया ही फक्त डोळ्यांमुळेच होऊ शकते. शिवाय आत्ता तुम्ही जी पोस्ट वाचत आहात, ती सुद्धा डोळ्यांच्याच मदतीने. समोर असणारा प्रकाश शरीराच्या आत आणून त्याच्यावर प्रक्रिया घडवून आणल्यामुळे आपल्याला माहितीचे ज्ञान होते.  असंच महत्वाचं काम लेन्सचं कॅमेऱ्यामध्ये आहे. सेन्सर प्रकाश गोळा करायचं काम करतो, तर तो प्रकाश सेन्सर वर एकत्रित करण्याचं काम लेन्स करते. ह्याच प्रक्रियेची माहिती आज आपण घेणार आहोत.       आपण फोटो केव्हा काढतो? जेव्हा आपल्याला समोर चालू असलेला क्षण जपून ठेवावा सा  वाटतो, आपल्यासाठी तो खूप महत्वाचा असतो किंवा जेव्हा आपण तो दुसऱ्यांना दाखवू इच्छितो. अशा वेळेला लेन्सचं काम सुरू होतं. मुळात फोटो काढण्याची प्रक्रिया ही लेन्स पासूनच सुरू होते.  लेन्सचे काही महत्वाचे भाग असतात. ते म्हणजे काचांचा संच (Glass elements in groups), अपर्चर (Aperture), इमेज स्टॅबिलायझेशन साठीची प्रणाली (Image stabilization system), ऑटो फोकस साठीची प...

आपल्याला एवढे मेगापिक्सेल खरंच लागतात का?

Image
‘तुम्हाला मेगापिक्सेल पाहिजेत ना, मग हे घ्या मेगापिक्सेल' आजकालच्या प्रत्येक मोबाईलच्या जाहिरातीत, कंपनी मनातल्या मनात ग्राहकाला हे वाक्य म्हणत असेल, असं मला नेहमी वाटतं.  कारण मोबाईलमध्ये जास्त मेगापिक्सेलचा सेन्सर द्यायची शर्यतच जणू कंपन्यांनी सुरू केली आहे. बघा ना....48 mp काय, 64 mp काय, एका नवीन मोबाईल मध्ये तर 108 mp चा सेन्सर दिला आहे कंपनीने. मुळात एवढे मेगापिक्सेल आपल्याला लागतात का? हा प्रश्न खूप कमी जणांना पडतो. बाकीचे बिचारे ग्राहक संख्येच्या प्रभावाला बळी पडून आपले पैसे कंपनीला देऊन मोकळे होतात, पण त्यांच्या हातात फारसं काही पडत नाही.  आपण कधी विचार केला आहे का, की मेगापिक्सेल ह्या संकल्पनेचा नक्की अर्थ काय? फोटोग्राफी मध्ये मेगापिक्सेल चा उपयोग काय आहे? ते कमी किंवा जास्त असतील तर फोटोमध्ये काय फरक पडतो? ह्याबद्दलची माहिती ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत.  'मेगापिक्सेल' हा शब्द दोन छोट्या शब्दांनी बनलेला आहे. 'मेगा' आणि 'पिक्सेल'. 'मेगा' ह्या शब्दाचा अर्थ 10 लाख एवढी संख्या. हा अर्थ इंग्रजी मापनपद्धतीवरून आला आहे. आणि 'पिक्सेल...

सेन्सर - कॅमेर्‍याचा आत्मा

Image
(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)          आपलं शरीर एकदम स्वस्थ असेल पण त्याच्या आत आत्माच नसेल तर त्या शरीराचा काय फायदा? बरोबर ना ?? आपल्या शरीरात जे काम आत्म्याचं आहे, तेच काम कॅमेऱ्यामध्ये सेन्सरचं आहे. सेन्सर नसला, तर कॅमेरा हा फक्त एक निरुपयोगी खेळणं होऊन जाईल. ह्याबद्दल सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये बघुयात.       आपल्याला माहीत आहे, की लेन्स प्रकाशाला आत आणून सेन्सर वर एकत्रित करण्याचं काम करते. आरसा आणि प्रिझम किंवा स्क्रीनच्या मदतीने आपण तो पाहू शकतो. प्रोसेसर आणि मेमरी कार्ड पण प्रकाशावर प्रक्रिया करायला तयारच आहेत. पण, जर कॅमेऱ्यामध्ये  सेन्सरच   नसेल, तर तो आत येणारा प्रकाश साठवून कसा ठेवणार? त्यामुळे फोटोग्राफी च्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सेन्सरला सर्वाधिक महत्वाचं स्थान आहे.       पण मग ह्याचा अर्थ असा आहे का, की बाकीचे भाग मुख्य नाहीत आणि ते नसतील तरी चालेल? अगदी नीट विचार केला तर खरंच चालेल. क...