फोटोग्राफी - एक कला
असं म्हणतात की वेळ कुणासाठी थांबत नाही. किंबहुना तशी ती थांबवताही येत नाही. त्यामुळे एखादी वेळ किंवा एखादा क्षण निघून गेला की गेला....आपण परत तो अनुभवू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक क्षण त्याच वेळी अनुभवायला आणि जगायला शिकलं पाहिजे😌 .
पण प्रत्येक वेळेला मनातून जरी तशी इच्छा असली, तरीही काही कारणांमुळे आपल्याला ते शक्य होईलच असं नाही. आपल्या मनानुसार सगळ्या गोष्टी घडतील असं नाही. पण ‘हीच आपली सीमा आहे’ असं मानून शांत बसेल तो माणूस कसला 😎. त्यामुळे ‘गरज ही शोधाची जननी आहे’ ह्या उक्तीतून प्रेरणा घेऊन आणि विज्ञानाची मदत घेऊन माणसाने ‘कॅमेरा’ ह्या अफलातून यंत्राचा शोध लावला. आणि त्याच्या वापराच्या तंत्राला आपण ‘फोटोग्राफी’ म्हणजेच ‘छायाचित्रण’ म्हणून ओळखायला लागलो. 📸
फोटोग्राफी हा मूळचा ग्रीक शब्द, दोन भाग असलेला (फोटो आणि ग्राफी). ह्या शब्दाचा अर्थ शोधायला गेलात, तर थोड्या फार फरकाने बरेच सापडतील. पण त्याचा ढोबळ मानाने अर्थ असा आहे की, ‘फोटो’ म्हणजे प्रकाश आणि ‘ग्राफी’ म्हणजे ‘चित्र वापरुन केलेलं सादरीकरण’. म्हणजेच आपण फोटो काढतो म्हणजे नक्की काय करतो, तर उपलब्ध असणार्या प्रकाशाचा वापर करून चित्र स्वरुपात एक मांडणी करतो.
अशी कल्पना करा, की समोर एखादा मस्त क्षण घडतो आहे आणि आपल्याला तो आयुष्यभरासाठी साठवून
ठेवायचा आहे. किंवा त्यावेळेला तिथे जे नाहीयेत त्या आपल्या माणसांना सुद्धा त्या
क्षणाचा आनंद द्यायचा आहे. अशा वेळेला आपोआपच आपला हात आपल्या खिशात जातो आणि
आपसूकच मोबाइल बाहेर येतो. आजच्या काळात हे सगळं आपल्या इतक्या सोईचं झालं आहे, की आपल्या दैनंदिन आयुष्याचा तो
एक महत्वाचा भागच झाला आहे असं म्हणा ना ! 😃
तसं बघायला
गेलं, तर ही एक (बर्यापैकी) साधी आणि (थोडीफार)
सरळ प्रक्रिया आहे. पण मग एखाद्याचे फोटो खूप चांगले येतात आणि काहींचे अगदीच
सुमार, असं कसं काय? ह्यावर बरेच जणांचं असं मत असतं, की त्याच्याकडे ‘चांगल्या दर्जाचा कॅमेरा किंवा
चांगला महागातला मोबाईल’ आहे म्हणून. हे बोलणं चुकीचं नसलं, तरी 100% बरोबर सुद्धा नाहीये हे लक्षात घ्यायला हवं. हे म्हणजे असं
म्हणल्यासारखं झालं की ‘एखाद्याचं अक्षर चांगलं आहे कारण त्याच्याकडे चांगलं महागातलं पेन आहे.’ असं अजिबातचं नसतं. चांगल्या
माध्यमाची मदत जारी होत असली, तरी त्या माध्यमापेक्षा अंगातली कला महत्वाची. त्यामुळे चांगले फोटो मिळवण्यासाठी
मुळात आधी अंगात कला आणि कलाकाराची नजर असायला हवी. बाकी मोबाईल किंवा कॅमेरा ही
तर फक्त माध्यमं आहेत. 🙂
याच संदर्भात बर्याच वेळेला लोक मला काही प्रश्न विचारात असतात. बघूयात त्यातले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं.
1.मुळातच, फोटोग्राफी शिकायची गरज आहे का? नुसतं क्लिक केलं की काम होतं की...😅
- बरोबर आहे. पण ‘नुसतं पोट भरण्यासाठी खाणे आणि चवीने खाणे’ ह्यात जो फरक आहे, तोच फरक ‘फोटोग्राफी न शिकता फोटो काढणे आणि योग्य शिक्षण घेऊन फोटो काढणे’ ह्यात आहे. त्यामुळे फोटोग्राफी शिकलेली कधीही चांगली. कारण काही क्षण हे एकदाच घडतात. त्याच वेळेला ते टिपण्यात काही चूक झाली, तर पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीही रहात नाही. उदाहरणार्थ अशी कल्पना करा की तुम्ही कुठेतरी ट्रेकिंगला गेला आहात आणि तिथल्या डोंगराच्या कड्यावरून दिसणारे सूर्यास्ताचे विहंगम दृश्य जितके सुंदर तुम्हाला दिसते आहे तितकेच सुंदर तुम्हाला कॅमेर्यात टिपायचे आहे. पण त्या वेळेला योग्य सेटिंग माहीत नसतील, तर मग होणारच की रंगाचा बेरंग. सगळाच आनंदी आनंद.
2. फोटोग्राफी शिकण्यात काय फायदा आहे? 🤔
- फायदाच फायदा आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमचे आनंदाचे क्षण आयुष्यभर जपून ठेवायचे असतील आणि आपण जो एखादा अविस्मरणीय अनुभव घेतोय, तोच अनुभव दुसर्यांना देऊन त्यांनाही आनंद द्यायचा असेल, तर फोटोग्राफी इतका चांगला दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाहीये. वरच्याच उत्तरातलं उदाहरण घ्या. तुम्हाला सेटिंग माहीत आहेत म्हणून तुम्ही सूर्यास्ताचा चांगला फोटो काढला, तर तो फोटो तुम्हाला घरी बसलेल्या तुमच्या आई वडिलांना किंवा नातेवाईकांना दाखवता येईल आणि त्यांच्या चेहर्यावरचा आनंद अमूल्य असेल. ☺ अशाच अनेक छोट्या छोट्या पण मौल्यवान आठवणी फोटोग्राफीमुळे तयार होतात, हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो.
3. मग ही कला अवघड आहे का? 🙄
- अजिबात नाही. फोटोग्राफी ही कला नीट समजून घेतली तर अजिबातच अवघड नाहीये.
4. ती कशी शिकू शकतो? 😐
- बाकीच्या सर्व कलांप्रमाणेच, फोटोग्राफीसुद्धा कुठूनही शिकता येते. म्हणजे शिकवणी लावून, नेटवर ऑनलाईन माहिती घेऊन, पुस्तकं वाचून, स्वतः सराव करत करत. आणि सगळ्यात सोप्पी आणि खात्रीशीर पद्धत म्हणजे, माझे हे ब्लॉग वाचून. ☺
5. ती शिकायला किती वेळ लागतो? ⌚
- वेळेचं म्हणाल तर कुठलीच कला अशी लगेच आत्मसात करता येत नाही. त्यासाठी खूप संयम ठेवावा लागतो. पण जर त्याचं फळ इतकं छान असेल, तर मग तेवढं थांबायला काहीच हरकत नाही, नाही का !
हे आणि असे असंख्य प्रश्न आपल्यापैकी बर्याच जणांना पडत
असतात. खरं सांगायचं तर मी जेव्हा फोटोग्राफी शिकलो नव्हतो, तेव्हा मलाही पडले. अगदी हेच
सगळे. पण एकदा ठरवलं तर कुणीही अगदी आरामात फोटोग्राफी शिकू शकतो.
आता बघूयात की फोटोग्राफी शिकायची
म्हणजे अगदी सुरुवातीपासून नक्की काय काय शिकायला लागतं.
सुरूवातीला शिकायचे मुद्दे
1.
कॅमेरा कसा धरावा :- जेणेकरून कॅमेरा सुरक्षितपणे
आणि सहज हाताळता येईल.
2.
कॅमेराचे भाग :- कुठले भाग काय काम करतात, ते शिकणे.
3.
कॅमेरा कसा काम करतो :- आपण क्लिक चं बटण दाबल्यावर कॅमेर्याच्या
आत काय घडत?
4.
कोंपोझिशन :– तुमच्या फोटोचा मुख्य विषय फ्रेममध्ये कसा
आणि कुठं ठेवायचा?
5.
एक्सपोजर सेटिंग :- फोटोत योग्य रित्या किती प्रकाश ठेवायचा, ते ठरवणे.
6.
फोकसिंग :- फोटोमध्ये महत्वाचा भाग कुठला आणि तो स्पष्ट कसा
दिसेल, ते ठरवणे.
7.
डेप्थ ऑफ फील्ड :- फोटोचा किती भाग फोकस मध्ये ठेवावा, ते ठरवणे.
8.
व्हाईट बॅलन्स :- फोटोमध्ये सर्व रंग योग्य प्रकारे दिसतील, ह्याची काळजी घेणे.
प्रगत सेटिंग करण्यासाठी शिकायचे
मुद्दे
1.
हिस्टोग्राम :- फोटोमध्ये उजळ आणि अंधार्या भागाचं प्रमाण किती आहे ते
बघणे.
2.
ब्लोन डिटेल्स :- फोटोचा अंधार्या आणि उजळ भागात काहीतरी बघण्यासारखे
असणे.
3.
एक्सपोजर मीटरिंग :- फोटोमध्ये कुठल्या पद्धतीने
एक्सपोजर ठरवावे.
4.
बॅकग्राऊंड कोम्प्रेशन :- फोटोत मागे असलेल्या गोष्टी
वेगळ्या पद्धतीने दाखवणे.
5.
निगेटिव्ह स्पेस :- फोटोमध्ये रिकाम्या जागेचा योग्य वापर कसा करावा.
6.
फ्लॅश सेटअप :- प्रकाशावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी फ्लॅश किती व कसा
वापरावा.
7.
हाय स्पीड सिंक फ्लॅश :- दिवसा सुद्धा फ्लॅश लागतो (खरंच).
तो वापरायला शिकणे.
आणि अजूनही बरेच काही........
आता एवढ्या गोष्टी शिकायच्या
म्हणजे इच्छाशक्ति आणि संयम तर हवाच ना....शिवाय महितीचा खात्रीलायक स्त्रोत हवा.
तुमची हीच
गरज पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉग तुम्हाला मदत करेल. वर सांगीतलेली आणि अजूनही बरीच
माहिती तुम्हाला इथे मिळेल. तेसुद्धा आपल्या सहजसोप्या मराठी भाषेत. त्याशिवाय
फोटोग्राफीशी निगडीत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळतील. तुम्ही
फक्त इच्छा दाखवा, माहिती आम्ही
पुरवू. ह्यापुढे आपण प्रत्येक पोस्ट मध्ये फोटोग्राफीमधल्या एका नवीन विषयाची
माहिती घेणार आहोत.
काय मग, या फोटोग्राफीच्या अद्भुत दुनियेची माहिती आणि मजा घ्यायला तयार आहात ना?
📸 😃 📸 😃 📸 😃 📸 😃 📸
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबरही शेअर करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर तेही विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. 😀🙏
- प्रसन्न जोशी.
पुढची पोस्ट:- फोटोग्राफी - फक्त आवड की एक चांगलं करियर?


मला आवडेल फोटोग्राफी बद्दल जाणून घ्यायला.
ReplyDeleteतुम्हाला नक्कीच चांगली माहिती मिळेल. 😃🙏
DeleteChan .mast.nakkich kahitri shikta yeil tumchya kadun
ReplyDeleteमाझाही तोच प्रयत्न असेल. 😃
Deleteछानच...अनेक शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद 🙏
DeleteMast kaam joshi saheb
ReplyDeleteधन्यवाद . 🙏
DeleteEk number
ReplyDelete😃🙏
DeleteChan ahe sir
ReplyDeleteधन्यवाद 😃🙏
Deleteउत्कृष्ट....
ReplyDelete😃🙏
Deleteकैमे-यात एवढ्या गोष्टी!
ReplyDeleteआजच कळल्या , कधी प्रयत्न पण केला नाही जाणून घेण्यासाठी,
असो, आपल्या प्रसन्न कडून जाणून घेऊन आजपासून. ❤❤
अजूनही बरंच काही आहे.....तुम्हाला सर्व माहिती मिळेल इथे. 😃
Deleteखूप सुंदर कलपना आपण लॉकडाऊन च्या काळात मांडली आहे जेणे करून छायचिञ कसेकाढले जातात व तयाती रचना /सेटिंग आखली जाते ये योग्य माह्ती आपण आमलांत आणुन दिली
ReplyDeleteखूप खूप शुभेच्छा
अगदी बरोबर बोललात आपण.
Deleteधन्यवाद 🙏
Nice initiative prasanna dada 👍🤝
ReplyDeleteधन्यवाद 😃🙏
Deleteप्रसन्न, ब्लॉग माध्यमाद्वारे एक छान अशी सुरुवात केली आहे. फोटो म्हटलं कि लहानथोरांच्या आवडीचा विषय. नव्हेतर जिव्हाळ्याचा विषय ! मला पण आवडेल सविस्तर माहिती घ्यायला. पुढील ब्लॉग लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा !
ReplyDeleteधन्यवाद 😃🙏
Deleteछान लेख.
ReplyDeleteपुढचे लेख वाचायला नक्की आवडेल.
अनेक शुभेच्छा!!
धन्यवाद 😃🙏.
Deleteलवकरच पुढचे लेख पोस्ट करेन.
प्रसन्ना शुभेच्छा!
ReplyDeleteधन्यवाद 😃🙏.
Deleteछान लेख ,सुंदर माहीती .
ReplyDeleteमस्त सुरुवात .
पुढचे लेख वाचूच .
तुला अनेक शुभेच्छा🌹🌹
धन्यवाद 😄🙏
Deleteछान माहिती मिळाली.
ReplyDeleteधन्यवाद 😄🙏. यापुढेही असाच प्रयत्न असेल माझा. 🙂
Deleteसुंदर आणि सखोल लेखन... ✌
ReplyDeleteधन्यवाद 😄🙏
Delete🤗फोटोग्राफि शिकण्याची खूपच आवड आहे त्यात तुमची साथ मिळणार म्हटल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला आहे.आपल्या आयुष्यातले क्षण आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करायला कोणाला आवडणार नाही 🤗त्यात सर तुमचे ब्लाॅग वाचुन नक्किच शिकण्याची इच्छा पूर्ण होईल तीहि साध्या सोप्या पद्धतीने.......❣️..सर पुढील ब्लाॅगसाठी खुप साऱ्या शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद 😄🙏. तुम्हाला पुढच्या पोस्ट सुद्धा आवडतील याची खात्री आहे मला.
Deleteखुप छान... फोटोग्राफी चा उत्कृष्ट अनुभव आणि त्यातून चांगले काही निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न वाखाणण्याजोगा!! तसेच अतिशय योग्य दरात उत्कृष्ट सेवा देणे ही तर खासीयतच आहे तुझी प्रसन्न... नावाप्रमाणेच स्वीकारलेले प्रत्येक काम प्रसन्नतेने करणे यामुळे आजतागायत खूप जणांना जोडून ठेवलंयस.. प्रत्येक प्रयत्नाला भरभरून यश मिळो...
ReplyDeleteएक समाधानी ग्राहक,
सौ.मुग्धा पंडित
संचालिका - विश्वरंग टूर्स
धन्यवाद 😄🙏
DeleteSir it is a new learning for me which I wished once upon a time.Thanks.मातृभाषेत ब्लाॕग खूप असल्यामुळे छान वाटले.प्रा.सौ.संगिता हेमंतराजे मावळे.
ReplyDeleteमॅडम, यापुढेही अशीच उपोगी माहिती ह्या ब्लॉगवर मिळेल तुम्हाला. धन्यवाद 😄🙏
Deleteसर...
ReplyDeleteतुमच्या कडून शिकतेय... हेच माझं भाग्य आहे.... कारण "ज्ञान " नुसतं जवळ असणं... आणि असून ते "देण्याचा प्रयत्न".... करणं यात खूप फरक आहे.... तुम्ही ते देताच.. तळमळीने .. पण अगदी.... पूर्ण समजेपर्यंत.
खूप खूप शुभेच्छा... !
नक्की शिकायला आवडेल.
धन्यवाद 😄🙏
DeleteGood 😄😄😄
ReplyDeleteधन्यवाद 😄🙏
Deletemast!!
ReplyDeleteधन्यवाद 🙂👍🏻
Deleteतंत्रज्ञानाच्या उपयोगावर मार्गदर्शक ठरणारा उत्कृष्ट ब्लॉग.
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙂
DeleteThis is for the first time in my life I came to know about the basic things about Camera and Photography.But I would like to learn many more related aspects of Photography.
ReplyDeleteOnly thing is that a humanbeing should remain a student forever since the knowledge is infinite that never comes to an end.
अगदी खरं बोललात 🙂👍🏻
Delete