फोटोग्राफी - फक्त आवड का एक चांगलं करियर ?


photography just as a hobby or as a profession?


    3 इडियट्स किंवा ये जवानी है दिवानी हे सिनेमे आपल्यापैकी बर्‍याच जणांनी बघितले असतील. 3 इडियट्स मध्ये फरहान (आर. माधवन) वाइल्ड लाईफ फोटोग्राफी करण्यासाठी घरच्यांना समजावून सांगतो आणि ये जवानी है दिवानी मध्ये बनी (रणबीर कपूर) तर घरच सोडून जातो. त्यानंतर आपल्यापैकी बर्‍याच जणांना असं वाटलं असेल, की असं आयुष्य जगता आलं पाहीजे. आपल्याला आवडतात त्याच गोष्टी करता आल्या पाहिजेत म्हणजे आयुष्यभर आपण आनंदी राहू आणि त्यातूनच पैसे पण मिळवता आले पाहिजेत म्हणजे अर्थार्जन सुद्धा सोपं होऊन जाईल. अशा वेळेला मला काही वाचलेली वाक्यं आठवतात, की ‘Follow your passion and the success will follow you.’, ‘Your job will not create happy memories, your hobbies will.’, ‘Do what you like. Otherwise you will be forced to like what you do.’, वगैरे वगैरे. ऐकायला ही कल्पना कितीही रंजक असली, तरीही तेवढं सरळ सोपं नाहीये ते.  😅
‘आपली आवड हेच आपलं करियर होऊ शकतं का?’ या प्रश्नाचं उत्तर एवढ्या सहजासहजी मिळत नाही. फोटोग्राफी च्या बाबतीत तर हा सगळ्यात जास्त गोंधळ उडवणारा प्रश्न आहे. कारण आपल्या आजूबाजूला जवळपास प्रत्येक घरात जेव्हा एक ‘कॅमेराधारी’ असतो, तेव्हा खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की हाच व्यवसाय करून आपली आवड तर पूर्ण होईल पण पैशांचं काय? कारण काहीही केलं तरी पैशाचं सोंग आणता येत नाही हेच खरं. 🤔
मुळात बर्‍याच जणांना, फोटोग्राफी ही फक्त आपली आवड आहे, का आपलं ध्येयच फोटोग्राफीचा व्यवसाय करणे हे आहे, हेच माहीत नसतं. दोन्ही मधला फरक लक्षात घ्यायला हवा. आवड म्हणजे एका ठराविक पातळीपर्यंत आपण त्यासाठी प्रयत्न करू शकतो, त्याला वेळ देऊ शकतो. पण ध्येय गाठायचं म्हणलं, तर मग त्यासाठी पूर्ण अभ्यास करायची आणि त्यात झोकून देऊन व्यवसायासाठी लागेल ते करायची तयारी असायला हवी. 😀👍🏻 
अजून एक महत्वाचा मुद्दा हा, की ‘मला आवड आहे’ आणि ‘मला चांगलं जमतं’ हयातलं आपल्याला काय लागू होतं हे प्रत्येकाने आधी समजून घ्यावं. कारण ‘गाण्याची आवड असणारे’ खूप असतात पण ‘गाणं चांगलं जमणारे’ तसे कमीच, नाही का ! व्यवसाय करायचा असेल, तर स्वतःची इच्छा तर पाहिजेच, पण आपण काढलेले फोटो दुसर्‍यांना आवडणे पण तेवढंचं महत्वाचं आहे. तरच आपल्याला लोक पैसे देतील ना. 😅😁
आता हा झाला आवडीचा भाग. पण करियर म्हणून फोटोग्राफीचा व्यवसाय करायचा असेल, तर त्याबाबतीत असलेले काही चांगले आणि काही लक्षात घेण्यासारखे मुद्दे आपण बघूयात.

चांगले मुद्दे
1. कामाचा आनंद आणि समाधान 😃😌:- आपल्या आवडीचं काम करायला मिळत आहे, ही भावनाच खूप मस्त असते. 
2. कंटाळा येत नाही 🤩:- आवडीचंचं काम असल्याने त्याचा कधी कंटाळा येत नाही, किंवा इच्छा नसताना काम करावं लागलं, म्हणून दु:ख होत नाही. 
3. नवीन अनुभव 😃:- नोकरीपेक्षा फोटोग्राफीच्या व्यवसायात प्रत्येक वेळेला नवीन माणसे भेटतात. नवीन ओळखी होतात आणि कामाच्या बदलामुळे नवीन नवीन अनुभव मिळतात. 
4. फिरण्याची संधी 🕺🏻💃🏻✈🚗:- कामाच्या निमित्ताने नवीन नवीन ठिकाणी फिरण्याची संधी मिळते. 
5. बरेच पर्याय उपलब्ध 📋:- फोटोग्राफीमध्येच इतके वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, की करण्यासारखं प्रत्येकाच्या आवडीचं काही न काहीतरी त्यात आहेच. 
6. कधी न संपणारी मागणी 📸📸📸:- फोटो काढून घेणे ह्या प्रक्रियेला कधी मरण नाही. कारण कितीही जग बदललं, तरी फार फार तर माध्यमं बदलतील, पण फोटो काढून घ्यायची गरज काही संपणार नाही. 
7. पैसे कमावण्याची संधी 💸💸💸 :- एकदा आपल्या संकल्पना मजबूत झाल्या, की मग वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी लागणारे विशिष्ट ज्ञान किंवा कौशल्य आपण सहज आत्मसात करू शकतो. आपण पदवी नंतर उच्चशिक्षण घेतो आणि स्पेशलायझेशन करतो, अगदी तसंच. त्यामुळे एखाद्या ठिकाणी विशिष्ट कौशल्य असलेली व्यक्ती पाहिजे असताना जर आपल्याला तिथे संधी मिळाली, तर थोड्या काळातच बक्कळ पैसा कमावता येऊ शकतो. 

लक्षात घेण्यासारखे मुद्दे
1. प्रचंड खर्चीक 😣:- फोटोग्राफी हा एक प्रचंड खर्चिक प्रकार आहे. असं का, कारण त्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टी म्हणजे कॅमेरा, वेगवेगळी लेंसेस, फ्लॅश, लाईट मॉडीफायर, बॅकड्रॉप, फिल्टर्स, ट्रायपॉड, मेमरी कार्ड्स, क्लिनिंग किट, हार्ड डिस्क सारखी स्टोरेज डिव्हाइसेस, एडिटिंग साठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, एडिटिंग सॉफ्टवेअर, इतर ऍडीशनल गोष्टी ई सर्व गोष्टींसाठी पैसे खर्च करायला लागतात. मान्य आहे की सगळ्यांनाच एवढ्या सगळ्या गोष्टी लागणार नाहीत, पण व्यवसाय यशस्वी आणि भरपूर उत्पन्न देणारा करायचा असेल, तर यापैकी 90% गोष्टी लागतातच.
2. सहनशक्ती 😓:- फोटोग्राफी हा व्यवसाय, 'वस्तू' आणि 'सेवा' ह्यापैकी 'सेवा' ह्या प्रकारात मोडणारा असल्यामुळे, कामाचे पैसे लगेचच मिळतात असं नाही....त्यामुळे तशी मानसिक तयारी ठेवावी लागते.
3. बदलता आर्थिक ओघ ⬆⬇:- तुम्ही जर वेडिंग फोटोग्राफी करणार असाल, तर 'ऑक्टोबर ते मे'  ह्या महिन्यांमध्ये खूप मुहूर्त असल्यामुळे बऱ्यापैकी ऑर्डर मिळतात. बाकीच्या महिन्यांमध्ये तशी शक्यता खूप कमी असते. त्याची तयारी ठेवावी लागते.
4. ठराविक रक्कम न मिळणे 😥:- मार्केट कंडिशन नुसार आपल्याला आपल्या कामाचे पैसे कमी जास्त करावे लागू शकतात. त्यामुळे आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता असते.
5. काळाबरोबर बदलणे 👨🏻‍💻:- बदलत्या काळानुसार नवीन नवीन ट्रेंड येत असतात. किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत असतं. ते आपल्या कामात समाविष्ट करणं गरजेचं असतं. त्यामुळे जास्त कामं मिळू शकतात. शेवटी काय तर 'मागणी तशी सेवा' हे समजून घेतलं, तरच तुम्हाला जास्तीत जास्त लोक संपर्क करतील.
6. कामाच्या वेळा निश्चित नसणे 🕐🕞🕧:- ठराविक वेळेतच काम केलं आणि झालं, असं फोटोग्राफीच्या व्यवसायात क्वचितच होतं. सकाळी सूर्योदयाच्या आधी लोकेशन वर पोहोचायचं असेल, किंवा रात्री सगळं काम संपल्यानंतर मग घरी येणं असेल.....सकाळी 5 ते रात्री 12-1 पर्यंत कधीही काम करण्याची तयारी ठेवावी लागते. शिवाय डेडलाईन किंवा अचानक आलेलं अर्जंट काम, ह्यामध्येही काम करण्याची तयारी लागते. 
7. कामात लवचिकपणा हवा  :- कला ही प्रत्येकासाठी वेगवेगळी संकल्पना आहे. जसं चित्रकलेच्या बाबतीत, काहींना फक्त निसर्गचित्रातच खरी कला दिसते, तर काहींना अबस्ट्रॅक्ट चित्रही आवडून जातं....तसंच, आपण काढलेले एखाद्या विशिष्ट ढंगाचे फोटो काहींना आवडतील तर काहींना नाही आवडणार. त्यामुळे कधी कधी, आपल्याला काय बरोबर वाटतंय, त्यापेक्षा ग्राहकांना आवडतील तसे फोटो काढावे लागतात. हेच मुख्यत्वे समजून घेतलं पाहिजे.
8. चांगला जनसंपर्क 👪👨‍👨‍👦‍👦👩‍👩‍👦👨‍👧‍👧👩‍👩‍👧‍👦:- कुठलाही नामांकित फोटोग्राफर हे मान्य करेल, की आपली सगळ्यात चांगली जाहिरात ही आपल्या कामातूनच होते. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची जाहिरात लोक स्वतःहुनच करतात. त्यामुळे सतत चांगला जनसंपर्क ठेवायला लागतो आणि तो वाढवण्यावर भर द्यावा लागतो. 
9. ह्या व्यवसायात झालेली गर्दी 😣🥴😵:- आजकाल काहीही ज्ञान नासलेले खूप जण फोटोग्राफीच्या व्यवसायात येत आहेत. फोटोग्राफी शिकण्यात त्यांचा वेळ, पैसा आणि मेहनत लागलेली नसते. त्यामुळे ते स्वस्तात कामं करून देऊ लागतात. पण प्रोफेशनल फोटोग्राफरने ह्या व्यवसायासाठी वेळ, पैसा आणि प्रचंड मेहनत घेतलेली असते. त्यामुळे त्यांचे दर जास्त असतात. अशा वेळेला ग्राहक दोघांच्या दरामध्ये तुलना करतात आणि काही जण कमी पैशाला भुलतात. अशाने ज्याला खरंच काम मिळायला हवं होतं, त्याला मिळत नाही आणि ग्राहकही संतुष्ट होत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या कामाच्या दराचे योग्यप्रकारे समर्थन करता आलं पाहिजे. 
एकंदरीत काय, तर फोटोग्राफीचा व्यवसाय हा सोपा पण नाही आणि अवघड पण नाही. कुणी जर तसा विचार करत असेल, तर हे सगळे मुद्दे त्याला निर्णय घ्यायला उपयोगी पडतील. त्यामुळे ज्याने त्याने स्वतःच ठरवायचं आहे, की फोटोग्राफी ही माझ्यासाठी काय आहे....

‘फक्त माझी आवड, का माझं करियर?’

:- प्रसन्न जोशी.

हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. फोटोग्राफी बद्दल काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. 🙂🙏
आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. धन्यवाद. 🙏

पुढची पोस्ट:- मोबाइल भारी का कॅमेरा भारी?

हसत रहा आणि शिकत रहा.
📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸

Comments

  1. Nice information! those who are thinking about choosing photography as core carrier should introspect on all these points.

    ReplyDelete
  2. विषयाची खोली कळूलागली आहे.
    आणि एका चांगल्या शिक्षका समोर असल्या सारखे वाटतय.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. पुढच्या पोस्ट पण तुम्हाला नक्की आवडतील. 🙏😊

      Delete
  3. Khup chan sir
    😍😍😍😍😍📸😍😍😍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला