Posts

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

Image
  (Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)     मोबाईल हे यंत्र जेव्हापासून आपल्या हातात आलं आहे, तेव्हापासून आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींची जागा त्याने घेतली आहे. आधी आपल्याला गाणी ऐकायला रेडियो किंवा आयपॉड लागायचा, गजरासाठी घड्याळ लागायचं, प्रकाशासाठी बॅटरी लागायची आणि बरंच काही. पण आता ही सगळी कामं एकट्या मोबाईल मध्येच होतात.      आजकालच्या मोबाईलमध्ये असलेलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तमोत्तम होत चाललेला कॅमेरा . काही ठराविक गोष्टी सोडल्या, तर बाकी सगळ्या बाबतीत मोबाईलचा कॅमेरा, DSLR किंवा मिररलेस कॅमेऱ्याएवढाच चांगला फोटो देऊ शकतो. काही वेळेला व्हीडीओसुद्धा. त्यातही त्या कॅमेऱ्याला काही ऍक्सेसरीजची जोड दिली तर आपल्याला अजूनच चांगले फोटो  किंवा व्हीडीओ काढता येतात. शिवाय काही मोबाईल ऍप्स सुद्धा काढलेला फोटो किंवा व्हीडीओ चांगला बनवण्यात मदत करू शकतात.  अशाच काही ऍक्सेसरीज आणि ऍप्स ची साधारण माहिती ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण ...

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

Image
     आजकाल 'सोशल मीडिया' हे एक नवीन जगच बनलं आहे. व्हाट्सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी ऍप्स आहेत. पण काही जण ही ऍप्स फक्त, दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे ह्याची माहिती घेणे आणि आपल्या आयुष्यात काय काय चालू आहे ह्याची माहिती बाकीच्यांना देणे, ह्यासाठीच वापरतात.       पण आपण ही ऍप्स बाकीच्या बऱ्याच कामांसाठी वापरू शकतो, ज्याच्यासाठी त्यांच्यामध्ये दिलेल्या बऱ्याच सोयींचा उपयोग होईल. जसं की फोटोग्राफर म्हणून आपला एक पोर्टफोलिओ तयार करणे, ह्याच क्षेत्रातील बाकीच्या लोकांशी जोडले जाणे, व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करणे, ई.      आता हे सर्व करण्यासाठी आपल्याला सतत फोटो आणि व्हीडीओ आपलोड करावे लागतात. पण हे करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत , ज्याच्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळेल आणि पुढे काही त्रास सुद्धा होणार नाही. अशाच काही साध्या पण महत्वाच्या गोष्टी आपण ह्या पोस्टमध्ये बघणार आहोत.      पहिल्यांदा आपण बघुयात की आपण टाकत असलेल्या फोटोला आणि व्हीडीओला चांगला प...

उत्तम सेल्फी काढण्यासाठी ट्रीक्स आणि टिप्स

Image
      सेल्फी हा प्रकार माहीत नसलेला माणूस आपल्याला सापडणारच नाही. प्रत्येक जण नेहमी सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असतो. हॉटेलमध्ये जेवताना, फिरायला गेल्यावर, लग्नात नवरानवरी बरोबर स्टेजवर किंवा अगदी गाडी चालवताना सुद्धा.      काही जण तर सेल्फी काढताना स्थळ आणि काळाचं भान सुद्धा विसरून जातात. असा हा सेल्फी चा महिमा. 😅      सेल्फी म्हणजे काय हे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं, तर 'स्वतःचा किंवा आपल्या ग्रुपचा स्वतःचाच काढलेला फोटो, म्हणजे सेल्फी' . आता खरं म्हणजे हे सांगायची तशी काही गरज नाही. पण बऱ्याचदा काही लोक समोरच्याला असं बोलून जातात, की 'हा घे मोबाईल आणि माझा सेल्फी काढ.' . त्या खास लोकांसाठी सेल्फीची ही व्याख्या. 😂      एक चांगला सेल्फी काढण्यासाठी बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. त्यातले काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. 1. मोबाईल हातात कसा धरावा? 2. मोबाईलमधल्या काही खास मोड्सचा वापर. 3. सेल्फी काढताना फ्रेमिंग कसं करावं? 4. आपला चांगला अँगल ओळखणे. 5. सेल्फी स्टिक चा वापर. चला तर मग, ह्याच मुद्द्यांची सविस्तर म...

फोटोमधली 'डेप्थ ऑफ फील्ड' म्हणजे काय?

Image
  आजचं कॅमेरा तंत्रज्ञान खूप विकसित झालं आहे. मोबाईल कॅमेऱ्यांमुळे फोटोग्राफीही कॉमन झाली आहे. फोटोग्राफीचे असंख्य प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकाची काही वैशिष्ट्ये आहेत. तरीही 90% लोकांना बॅकग्राउंड ब्लर झालेले फोटोच आवडतात. कारण ते दिसायला खरंच खूप छान दिसतात आणि आपल्याला फोटोमधला महत्वाचा भाग लगेचच कळतो. आपण जेव्हा असे फोटो बघतो, तेव्हा मनात विचार येतो, की हा ब्लर कमी जास्त कसा करायचा? तो कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतो? नेहमी जास्त ब्लरच चांगला असतो का? ह्याच प्रश्नांना अनुसरून आपण ह्या पोस्ट मध्ये माहिती घेणार आहोत. 'ब्लर' हा शब्द आपण सहजच वापरतो. पण तो इफेक्ट तांत्रिकदृष्ट्या 'डेप्थ ऑफ फिल्ड' मुळे तयार होतो. फोटोमध्ये आपल्याला सगळ्यात पुढं जी गोष्ट दिसते, ती आपल्या जवळ असते आणि सगळ्यात मागे जी गोष्ट दिसते, ती आपल्यापासून सगळ्यात लांब असते. फोटोग्राफी मध्ये पुढून मागे जाणारं हे अंतर 'खोली' मध्ये मोजतात. म्हणून इथे 'डेप्थ' हा शब्द वापरला जातो. आणि इथे 'फिल्ड' ह्या शब्दाचा अर्थ 'फोकस मध्ये असलेला भाग' असा घेतला जातो. हा फोकसमध...

ऍक्शन कॅमेरा म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका

Image
(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)      आपण ह्याआधीच्या एका पोस्ट मध्ये कॅमेऱ्याचे मुख्य प्रकार बघितले आहेत. म्हणजे पोलराईड कॅमेरा, पॉईंट अँड शूट कॅमेरा, DSLR कॅमेरा आणि मिररलेस कॅमेरा. (ती पोस्ट वाचली नसेल, तर ह्या लिंकवर जाऊन वाचू शकता.:- कॅमेर्‍याचे प्रकार )      पण त्यातल्या पॉईंट अँड शूट कॅमेऱ्याचा दुसरा एक प्रकार असाही आहे, की समोर बघितल्यावर कुणालाही वाटणार नाही की तो एवढा जबरदस्त आहे. तो प्रकार म्हणजे 'ऍक्शन कॅमेरा'.      ऍक्शन कॅमेरा म्हणजे नक्की कुठला कॅमेरा? तर त्याच्या नावावरून आपल्याला कळतंय तसाच तो आहे, म्हणजे ऍक्शन शूट करण्यासाठी. मग ती ऍक्शन कुठलीही असो. म्हणजे कुठलाही खेळ असो, पाण्याखाली केलेलं स्कुबा डायव्हिंग असो, बर्फात केलेलं स्कीइंग असो किंवा अगदी साधी बाईक राईड असो. अशा बऱ्याच ठिकाणी ऍक्शन कॅमेऱ्याचा उपयोग होतो, जिथे बाकी कुठलेही कॅमेरे वापरणं शक्य होत नाही. ह्याचीच माहिती ह्या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत.    ...